साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊसाठे महामंडळ अनुदान (कर्ज)योजना 2023।
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊसाठे महामंडळ अनुदान (कर्ज)योजना 2023।
शासनाच्या वतीने स्वयंरोजगाराच्या वाढीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध शासकीय विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग आयोग यासारख्या संस्थांमार्फत शहरी व ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या प्रकल्पांसाठी अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडून अर्थसाहाय्य देण्यात येते.
मातंग समाजातील सुशिक्षित बेरोजगार आणि त्यांच्या उन्नती साठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ स्थापना करून समाजाच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या मुख्य भागात स्थान मिळवण्यासाठी ही योजना स्थापन झाली आहे.
वरील संस्थांमार्फत अर्थसाहाय्य उपलब्ध करून घेता येते. या सोबतच अनेक प्रकारची आर्थिक विकास महामंडळे यांच्या माध्यमातून सरकार रोजगारासाठी सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक मदत करते. या मध्ये महात्मा फुले विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय वित्त व आर्थिक विकास महामंडले, वसंतराव नाईक भटक्या-विमुक्त-जाती महामंडळ, शबरी आदिवासी विकास महामंडळ सरकार, मौलाना आझाद आर्थिक महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या मार्फत , साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ तसेच स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना इ.चा समावेश आहे. वरील संस्थांकडून या उद्योगास अर्थसाहाय्य केले जाते. या संस्था उद्योगांसाठी लागणारी अवजारे, यंत्रसामग्री, अल्पकालीन किंवा दीर्घकालीन कर्जपुरवठा, प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण, उद्योजकता विकास प्रशिक्षण इ. साठी साहाय्य करतात.
काही आर्थिक विकास महामंडळे थेट आर्थिक मदत करतात तर काही संस्था या उद्योगासाठी लागणारी अवजारे, यंत्रसामग्री, अल्पकालीन किंवा दीर्घकालीन कर्जपुरवठा, उद्योगाचे प्रशिक्षण, उद्योजकता विकास प्रशिक्षण इ. साठी साहाय्य करतात.
आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाविषयी विशेष माहिती बघणार आहोत.
खास तुमच्या साठी वाचा सविस्तर>>>>
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊसाठे महामंडळ अनुदान (कर्ज)योजना 2023। Lokashahir Annabhau Sathe Anudan(karj) yojna 2023
स्थापना :-
अण्णाभाऊ साठे या महामंडळाची स्थपणा जुलै 1985 साली.
महाराष्ट्रातील दारिद्रय रेषेखालील मातंग जातींतील व्यक्तींना गरीबीतून आपली उपजीविका भागगविण्यासाठी आणि समाजात त्यांना मानाचे स्थान मिळावे या कारणाने त्यांचा सर्वांगीण विकास होव्हा या साठी.
लोकशाहीर आण्णा भाऊसाठे महामंडळ अनुदान योजना 2023। Lokashahir Annabhau Sathe Anudan(karj) yojna 2023
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ भागभांडवल 2.5 कोटी वरून 300 कोटी करण्यात आले आहे.
मुख्य उदिष्टे-
मातंग समाजातील सुशिक्षित बेरोजगार तसेच महिला आणि रोजगार करू इच्छित नाऱ्या व्यक्तींना आर्थिक पाठबळ मिळावे आणि समाजात ताठ मानेने उभे राहावे या साठी.
पुढील पोट – जातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य मिळते
1) मांग 2)मातंग 3) मदारी 4) राधे मांग 5) मांग गारुडी 6) मिनी मादीग 7) दानखणी मांग 8) मांग महाशी 9) मांग गारोडी 10) मादिंग 11) मादीगा 12) मादगी
मुदत कर्ज योजना-
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनांमध्ये अर्जदारांना कोणत्याही व्यवसाय करण्याकरिता त्या व्यवसायातील गुंतवणूक ही कमीत कमी पाच लाख रुपये पर्यंत असावे अशाच व्यवसायाकरिता मुदत कर्ज योजना दिली जाते या योजनेअंतर्गत व्यवसायाची कर्ज परतफेड ही पाच वर्षापर्यंत असते यामध्ये कर्जाचा व्याजदर चार टक्के असतो आणि जर या योजनेच्या बाहेरील करत लोन वरती सहा पर्सेंट व्याजदर असतो
2. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महिला समृद्धी योजना(Mahila Samrudhi yojana):-
महिला समृद्धी सशक्तिकरण या योजनेच्या अंतर्गत ज्या महिला अर्जदार असतील त्यांना किंवा लाभार्थ्यांना कमीत कमी 50 हजार रुपयापर्यंत कर्ज मिळते योजनेमध्ये अर्जदाराला अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत दहा हजार रुपये अनुदान मिळते तर 40 हजार रुपये अनुदान हे एन एस एफ डी सी चे असते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजनेमध्ये महिला समृद्धी योजना सन 2004 ते 2005 पासून राबवली जाते ही योजना मध्ये महिला अर्ज करू शकतात
ज्या महिला निराधार विधवा आणि करिता महिला असतील अशा महिलांना अण्णाभाऊ साठे महामंडळ महिला समृद्धी योजनेमध्ये प्रधान्य देण्यात येते या योजनेमध्ये लाभार्थ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने काढण्यात येते अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजनेमधील महिला समृद्धी योजना यामुळे महिलांची कौटुंबिक उत्पन्न मर्यादा निश्चित केली आहे ग्रामीण भागामध्ये अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 81 हजार रुपये एवढे असावे तर शहरी भागासाठी उत्पन्नाची जी मर्यादा आहे ती एक लाख रुपये असावे
3. बीज भांडवल योजना (Margin Money) :-
बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्जदाराला कर्जाची मर्यादा ही 50 हजार रुपये पासून ते सात लाखापर्यंत आहे या योजनेमध्ये मंजूर रकमेमधून दहा हजार रुपये वगळण्यात येते तसेच उर्वरित रकमेतून पाच टक्के हिस्सा अर्जदाराला भरावा लागेल त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचा हिसा 20% तर राहिलेल्या 75 टक्के हे बँकेचे कर्ज असते या योजनेमध्ये खर्च दराला चार टक्के व्याज भरावे लागेल
योजनेच्या प्रमुख अटी-
- 1)अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा
- 2)अर्जदाराचे वय 18 वर्ष पुणर् असावे
- 3)अर्जदार हा मातंग समाजाच्या 12 पोटजातील असावा.
- 4)अर्जदाराने निवडलेला व्यवसायाचे ज्ञान असावे
सोबत जोडावयाची कागदपत्रे
- 1) अर्जदाराचा जातीचा दाखला (सक्षम अधिकारी यांच्याकडुन घेतलेला असावा.)
- 2) अर्जदाराच्या कुटूंबाचा उत्पन्नाचा दाखला.(तहसीलदार यांच्याकडुन घेतलेला असावा.)
- 3) नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या 2 प्रति जोडाव्यात.
- 4) राष्ट्रीय अनुसूचित जाती,जमाती वित्तीय विकास महामंडळाच्या योजनेचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराच्या बाबत नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या 3 प्रती जोडाव्यात.
- 5) अर्जदाराच्या शैक्षणिक दाखला
- 6) रेशनकार्डच्या झेरॉक्स प्रती.
- 7) व्यवसायाच्या ठिकाणचा जागेचा पुरावा.
- 8) ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरवा.
- 9) वाहन खरेदीसाठी वाहनाच्या बुकिंगबद्यल/किंमतीबाबत अधिकृत विक्रेता/कंपनी कडील दरपत्रक.
- 10) व्यवसायासंबबधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला.
- 11) व्यवसायासंबंधी प्रकल्प अहवाल/खरेदी करावयाच्या मालाचे, साहित्याचे कोटेशन.
- 12) प्रतिज्ञा पत्र (स्टॅम्प पेपरवर)
Post a Comment